स्वराज्यात दिसलं संविधान

शिवबा, आज मी तुम्हाला पाहिलं…

रायगडाच्या मातीमध्ये उभं राहून काहीतरी वेगळंच जाणवलं…

तुमच्या स्वराज्यात…संविधान मला जिवंत दिसलं!!

समतेची वाट तुम्ही दाखवली, तुमच्या स्वराज्यात,

धर्मनिरपेक्षता दिसली  तुमच्या वागण्यात।

धर्म  न पाहता , पाहिले  तुम्ही  गुण,

म्हणून आले अठरा पगड जातींचे जन एकत्र!

ज्यांला समजलं स्वराज्य … त्यांनी केला नाही जातीभेद,

आणि जे करतात जातीभेद … त्यांना समजलेच नाही शिवबा नावाचे खरेखुरे वेद!!

हिंदू-मुस्लिम भेद तुम्ही कधी केला नाही,

मंदिर असो की मस्जिद मान दोघांनाही कमी काही नाही।

नावात धर्म नव्हता कामाची ओळख होती,

शिवरायांनी शिकवली माणुसकी हीच एक जात होती 

धर्माशी नव्हता विरोध तुमचा…

विरोध होता अन्याय करणाऱ्या व्यवस्थेशी!

स्त्री असो की  दुर्बल अन्याय कोणावरही नाही,

शत्रूच्या स्त्रीलाही दिलात सन्मानाचा हक्क!

मुलींना दिलात तुम्ही समान हक्क,

आईच्या डोळ्यांतलं दुःख तुम्ही ओळखलं,

अन्यायाच्या ज्वालेत तिला जाऊ दिलं नाही,

स्त्री सन्मानासाठी तुम्ही उभे राहिलात,

नव्या विचारांचं जग तुम्ही घडविलात !

समतेचा दीप तुम्ही पेटवला,

बंधुत्वाचा धागा विणला सगळ्यांत …

न्याय दिला दुर्बलांना  ठाम उभं राहून,

स्वातंत्र्याता दिली विचारांना  पाठीशी  उभे राहून !

सार्वभौमतेचा अभिमान होता प्रत्येक निर्णयात,

लोकशाही दिसत होती जनतेच्या हक्कात!

हेच तर शब्द आहेत भारतीय संविधान चे महान

न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे गान!!

संविधान पाहिलं…आणि मला ते दिसलं स्वराज्य 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *