विठ्ठला पाहिली मी तुझी पंढरी त्या चंद्र भागी
ठेऊन हात कर्कटा वरती
घेतला आदर्श त्या पुंडलिकाचा
आई बाबात पाहिले तुला मी
आले जे तुझ्या पाशी त्याचा तू झाला कैवारी
गेला तू ज्यांचा कडे झाला त्यांचा तू सोयरी
माझा झाला त्यांचा झाला येडा मोठा कसा तू
तू म्हणत नाही मोठा मी तुझ्या भक्तीतुन दिसतो मोठा तू
माझा विठ्ठल तू
पाहिला मी तो महाराज ज्याने आयुष भर तुझी वारी केली आणि तुझी पांढरी पहिली आणि साफ केली
झाली दिवसाची रात्री गाईले तुझे अभंग
आणि पहिला मी तो तुका त्याचे अभंग ऐकून
तू मोहित होई त्याचा साठी तू त्याची गाथा वाचवली
तुझीसाठी मी एक केली परतीची वारी आणि
येता येता दिसली मला गुरे चोखोबाची
मी ती पहिली , ती मी राखली
दिसत नामदेव गळा भेट झाली तुळशी माळ पहिली
मन आनंदित झाले
पावले चालू लागली आळंदीची वाट
माऊली माऊली गजर जगात
होता आळंदीचे दर्शन येई
माऊली कंटातून येई
पाहत माऊली कंट दाटून येई
घेतले माऊलीचे दर्शन
मन विठ्ठल विठ्ठल झाले
Leave a Reply