Rajesh Rathod

  • विठ्ठल

    विठ्ठला पाहिली मी तुझी पंढरी त्या चंद्र भागी 

    ठेऊन हात कर्कटा वरती  

    घेतला  आदर्श त्या पुंडलिकाचा 

    आई बाबात  पाहिले तुला मी

    आले जे तुझ्या पाशी त्याचा तू झाला कैवारी 

    गेला तू ज्यांचा कडे झाला त्यांचा तू सोयरी 

    माझा झाला त्यांचा झाला येडा मोठा कसा तू 

    तू म्हणत नाही मोठा तुझ्या भक्तीतुन दिसतो मोठा तू 

    विठ्ठल माझा तू 

    पाहिला मी तो  महाराज ज्याने आयुष भर तुझी वारी केली आणि तुझी पांढरी पहिली आणि साफ केली 

    झाली दिवसाची रात्री गाईले तुझे अभंग 

    पहिला मी तो तुका ज्याचे अभंग ऐकून 

    तू मोहित होई त्याचा साठी तू त्याची गाथा वाचवली 

    तुझीसाठी मी एक केली परतीची वारी आणि

     येता येता  दिसली मला गुरे  चोखोबाची

     मी ती पहिली , ती मी राखली 

    दिसता नामदेव गळा भेट झाली तुळशी माळ पहिली 

    मन आनंदित झाले 

       पावले चालू लागली आळंदीची वाट 

    माऊली माऊली गजर जगात 

      होता आळंदीचे दर्शन येई 

     माऊली कंटातून

         पाहत माऊली कंट दाटून येई 

    घेतले माऊलीचे दर्शन 

    मन विठ्ठल विठ्ठल झाले 

  • निरोप माझा सर्वांना

    “निरोप माझा सर्वांना” 

    मी आणि माझं घर — तीस वर्षं गेली त्याला उंची द्यायला,

    आणि मी राहणार फक्त चाळीस वर्षं या घरात.

    माझं संपलं आयुष्य, मला तेवढं पुरणार,

    आणि संपलं  घराचं आयुष्य — त्याला तिथेच ठेवणार.

    तो तिथं एकटक कोणाची वाट पाहतो,

    आलेल्यांना धीर देतो, झोपलेल्यांना सावली देतो.

    काही दिवसांनी येणं-जाणं थांबतं,

    घरातल्या मुलंच खेळणं ही थांबतं ,

    आजोबांच्या पाठीवर खेळायची,

    तशी मुलं माझ्या छतावर खेळायची.

    ते (घर) मला छळतं — “तुम्ही सोडून गेलात, यात तुमची चूक कसली?”

    वेळेनुसार तेही चालायचं,

    पण मी एकटा… माझा रंग गेला, त्याला थोडं पाहा!

    नाही पाहिलं कुणी — माझी एकेक भिंत पडू लागली.

    झालं, संपलं माझं, पण;

     निरोप माझा घ्या…

    माझ्या भिंती पाडा, मला मोकळं करा,

    नाहीतर लोक माझ्या भिंतीचा साफळा पाहतील.

    ज्याने मला खिळ ठोकली , तोच आता थकून शांत झाला 

    संपलो मी… चाललो मी…

    ज्याने मला बनवलं — त्याला पुरलं,

    मला जागीच सोडलं.

    निरोप माझा सर्वांना… चलो मी.

    *****

  • राधा

    आज मी दोन राधा पाहिल्या 

    एक झाली प्रेमाची देवता, तर दुसरी झाली मायेची उभ

         प्रेमासाठी देवाने बासरीला दिले ओठ..…

      कर्णाने आयुष्यभर राधेयला सूतपुत्र म्हणून दिली ओखळ 

    कृष्णाने  राधेसाठी स्वतःचा कानाला पिळा दिला ,

    आणि राधेने कर्णासाठी स्वतःलाच आलिंगन दिलं

    एक राधा कृष्णाच्या मिठीत अमर झाली,

    आणि दुसरी राधा कर्णाच्या डोक्यावरून

    हात फिरवीत फिरवीत मूक झाली…

    सर्वांनी पाहिलं राधेचं प्रेम, दिसली नाही राधेच्या मायेची ओढ 

    एकीला जगाने देवी म्हटलं, आणि दुसरीला फक्त सूतपुत्राची आई…

    प्रेम मोठं की मातृत्व? 

    कारण प्रेम देवाला मिळालं, आणि मातृत्वाने योद्धाला…

    राधा एकच नाव, पण इतिहास दोन…….

    एक भक्तीचा,एक त्यागाचा…

    आणि त्यागातून फक्त कर्ण घडवतो.……

    प्रेमातून कृष्ण अमर ठरतो.……..

  • स्वराज्यात दिसलं संविधान

    शिवबा, आज मी तुम्हाला पाहिलं…

    रायगडाच्या मातीमध्ये उभं राहून काहीतरी वेगळंच जाणवलं…

    तुमच्या स्वराज्यात…संविधान मला जिवंत दिसलं!!

    समतेची वाट तुम्ही दाखवली, तुमच्या स्वराज्यात,

    धर्मनिरपेक्षता दिसली  तुमच्या वागण्यात।

    धर्म  न पाहता , पाहिले  तुम्ही  गुण,

    म्हणून आले अठरा पगड जातींचे जन एकत्र!

    ज्यांला समजलं स्वराज्य … त्यांनी केला नाही जातीभेद,

    आणि जे करतात जातीभेद … त्यांना समजलेच नाही शिवबा नावाचे खरेखुरे वेद!!

    हिंदू-मुस्लिम भेद तुम्ही कधी केला नाही,

    मंदिर असो की मस्जिद मान दोघांनाही कमी नाही।

    नावात धर्म नव्हता कामाची ओळख होती,

    शिवरायांनी शिकवली माणुसकी हीच एक जात होती 

    धर्माशी नव्हता विरोध तुमचा…

    विरोध होता अन्याय करणाऱ्या व्यवस्थेशी!

    स्त्री असो की  दुर्बल अन्याय कोणावरही नाही,

    शत्रूच्या स्त्रीलाही दिलात सन्मानाचा हक्क!

    मुलींना दिलात तुम्ही समान हक्क,

    आईच्या डोळ्यांतलं दुःख तुम्ही ओळखलं,

    अन्यायाच्या ज्वालेत तिला जाऊ दिलं नाही,

    स्त्री सन्मानासाठी तुम्ही उभे राहिलात,

    नव्या विचारांचं जग तुम्ही घडविलात !

    समतेचा दीप तुम्ही पेटवला,

    बंधुत्वाचा धागा विणला सगळ्यांत …

    न्याय दिला दुर्बलांना  ठाम उभं राहून,

    स्वातंत्र्याता दिली विचारांना  पाठीशी  उभे राहून !

    सार्वभौमतेचा अभिमान होता प्रत्येक निर्णयात,

    लोकशाही दिसत होती जनतेच्या हक्कात!

    हेच तर शब्द आहेत भारतीय संविधान चे महान

    न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे गान!!

    संविधान पाहिलं…आणि मला ते जिवंत दिसलं स्वराज्यात