जाऊदे त्या समुद्राकडे, त्या लाटा पाहुदे
पाहूदे चंद्राकडे, समुद्राच्या गोष्टी सांगूदे
पाहुदे तो अथांग समुद्र, त्यावरचे वादळ पाहुदे
अनंत काळापासून चाललेले, लहाटांचे युद्ध संपूदे
करू देत शंक शिंपले गोळा, मोत्याच्या माळी पाहुदे
पाहूदे लांब जाणाऱ्या बोटी, माश्यांचा उग्र वास येऊदे
पाहूदे संध्याकाळचा सूर्य, त्याच्याशी बोलूदे
ऐकुदे त्या समुद्राच्या व्यथा, बोलू देत सूर्याच्या कथा
भिजूदे त्या समुद्रात, त्याचा खारट वास येऊदे कपड्यात
जाऊदे समुद्राकडे, पाहुदे समुद्राकडे
*****
Leave a Reply