सकाळ झाली माझ्या विठ्ठलाची
लाऊनिया टिळा मस्तकी चंदनाचा
आला वारीत विठ्ठल माझा
विठ्ठल नामाचा राजा
तो नाचतो रिंगणा भोवती, लहान थोरा सोबती
वारी त्याची तो, पाहतो उघड्या डोळ्यांनी
आला लावणी टिळा चंदाचा
कधी भक्ता सोबत नियमाचे पालन करी
विठ्ठलाच्या पाया कोणी पाडलं, तोही त्याच्या पायापडी
विठ्ठल माझा आला टिळा चंदाचा लावणी
कधी येऊनी आजीच्या पदरातील भाकरी खाई
तर कधी आजोबा सोबत स्वतःचे नाव गात राही
साधा भोळा माझा विठ्ठल, आला टिळा लाऊनि
झोपला सगळ्या सोबत, देव आणि माणसात अंतर कमी करण्यासाठी
लहान मोठ्यांना एकत्र करण्यासाठी, आला विठ्ठल टिळा लाऊनि
होऊन बाप सगळ्याचा, मोठा आधार झाला
आला विठ्ठल माझा टिळा चंदनाचा लाऊनी
Leave a Reply