बाप

बेधुंद असतो बाप, अफाट असतो बाप,
निळ्या आभाळाच्या छताडापेक्षा मोठा असतो बाप…

मुलासाठी तर्क-वितर्कन पाहता,
त्याला जे जे योग्य वाटतं, ते ते करून जातो बाप…

मुलांच्या सुखसाठी, स्वतःचं सुखाचा त्यागतो बाप…
मुलांच्या स्वप्नांना भरारी देतो बाप…

मुलांच्या आयुष्या तला प्रकाश ठरतो बाप…

मुलाच्या एका हसण्यासाठी,
आपली हजार दुःख लपवतो बाप…
देवालाही प्रश्न विचारतो बाप…
कधी कधी देवासही भुरळ घालतो बाप…

खूप मोठा असतो बाप…
खरंच, खूप मोठा असतो बाप…

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *