“निरोप माझा सर्वांना”
मी आणि माझं घर — तीस वर्षं गेली त्याला उंची द्यायला,
आणि मी राहणार फक्त चाळीस वर्षं या घरात.
माझं संपलं आयुष्य, मला तेवढं पुरणार,
आणि संपलं घराचं आयुष्य — त्याला तिथेच ठेवणार.
तो तिथं एकटक कोणाची वाट पाहतो,
आलेल्यांना धीर देतो, झोपलेल्यांना सावली देतो.
काही दिवसांनी येणं-जाणं थांबतं,
घरातल्या मुलाचं खेळणं ही थांबतं ,
आजोबांच्या पाठीवर खेळायची,
तशी मुलं माझ्या छतावर खेळायची.
ते (घर) मला छळतं — “तुम्ही सोडून गेलात, यात तुमची चूक कसली?”
वेळेनुसार तेही चालायचं,
पण मी एकटा… माझा रंग गेला, त्याला थोडं पाहा!
नाही पाहिलं कुणी — माझी एकेक भिंत पडू लागली.
झालं, संपलं माझं, पण;
निरोप माझा घ्या…
माझ्या भिंती पाडा, मला मोकळं करा,
नाहीतर लोक माझ्या भिंतीचा साफळा पाहतील.
ज्याने मला खिळ ठोकली , तोच आता थकून शांत झाला
संपलो मी… चाललो मी…
ज्याने मला बनवलं — त्याला पुरलं,
मला जागीच सोडलं.
निरोप माझा सर्वांना… चालो मी.
*****
Leave a Reply