विठ्ठल

विठ्ठला पाहिली मी तुझी पंढरी त्या चंद्रभागी 

ठेऊन हात कर्कटा वरती  

पहिला पुंडलिक मी, आई बाबा पाहिले तुला मी 

आले जे तुझ्या पाशी त्याचा तू झाला कैवारी 

गेला तू ज्यांचा कडे झाला त्यांचा तू सोयरी 

माझा झाला त्यांचा झाला येडा मोठा कसा तू 

तू म्हणत नाही मोठा माझ्या भक्तीतुन दिसतो मोठा तू 

विठ्ठल माझा तू 

पाहिला मी तो  महाराज ज्याने आयुष भर तुझी वारी केली

तुझी पांढरी पहिली साफ केली 

झाली दिवसाची रात्र तुझे अभंग गाईले

पहिला मी तो तुका ज्याचे अभंग ऐकून 

तू मोहित होई त्याचा साठी तू त्याची गाथा वाचवली 

तुझीसाठी मी एक केली परतीची वारी आणि

 येता येता  दिसली मला गुरे  चोखोबाची

 मी ती पहिली , ती मी राखली 

दिसता नामदेव गळा भेट झाली तुळशी माळ पहिली 

मन आनंदित झाले 

   पावले चालू लागली आळंदीची वाट 

माऊली माऊली गजर जगात 

  होता आळंदीचे दर्शन येई 

 माऊली कंटातून

     पाहत माऊली कंट दाटून येई 

घेतले माऊलीचे दर्शन 

मन विठ्ठल विठ्ठल झाले 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *