रातराणी

आज एक घर पाहिलं, त्या घरा समोर उभा होतो.

समोर रातराणीचं एक शांत, समाधानाने भरलेलं झाड पाहिलं 

कळत नकळत

मी स्वतःलाच त्या सहवासात कैद झालेलं पाहिलं,

जणू तिच्या गंधाने

माझ्या अस्तित्वावरच कब्जा केला होता.

ती सुगंध देत राहिली—

न थांबता, न थकता,

आणि मी?

मी त्या सुगंधात स्वतःलाच हरवत गेलो.

तिने मला महकवण्यासाठी

कित्येक फुलं खर्च केली,

किती फुलांनी मला शराफ दिला 

काही फुलं तर

 माझ्यावर सहज कुर्बान झाली,

जणू म्हणत होती—

“आपलं जगणं याच्यासाठी होतं.”

आणि तिथे उभा राहून कळलं—

काही सहवासांचा सुगंध

जीवनभर पाठलाग करत राहतो…

जरी आपण तिथून पुढे निघून गेलो तरीही…

*****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *